विज्ञान चाचणी १ - हंगाम ५ वा

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान आणि मराठी पिझ्झा वेब पोर्टल च्या संयुक्त विद्यमाने आपण, काही शैक्षणिक उपक्रम राबवत आहोत, त्यापैकी एक - ऑनलाईन प्रश्नमंजुषा!

यात कोणत्याही विषयावरची चाचणी परीक्षा घेतली जाते. ही खुली परीक्षा असून यात गृहिणी, विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक कोणीही भाग घेऊ शकतात. विजेत्याला कोणतेही पारितोषिक दिले जाणार नाही 😊 याची नोंद घ्यावी. काहीतरी नवीन शिकायला मिळेल, आणि मराठीचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर आणणे, हाच अशा परीक्षांचा उद्देश! स्वतः अशा उपक्रमात सहभागी व्हा, आपल्या मित्र-परिवाराला देखील यात सामील करा.

---------------
आज रविवार, दिनांक ६ ऑगस्ट  २०१७ रोजी विज्ञानावर होणाऱ्या परीक्षेचा विषय आहे - #वनस्पतीआणिवनस्पतींचेविविधभाग

▪गुगल फॉर्म - https://goo.gl/8ZEuna
(गुगल फॉर्म रात्री ९ वाजल्यापासून प्रतिसाद स्वीकारायला सुरुवात करेल)

▪परीक्षेची वेळ - रात्री ९ ते १०

▪एकूण गुण - १०

▪निकाल - रात्री साडेदहा पर्यंत पुढील दुव्यावर मिळेल, यात केवळ पहिले ३ विजेते कळतील
- https://goo.gl/i7J9B7

▪उत्तर पत्रिका - बरोबर रात्री १०.०५ वाजता उत्तरपत्रिका या दुव्यावर अपलोड केली जाईल. यावरून आपले गुण ठरवा.
- https://goo.gl/i7J9B7
---------------

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीपिझ्झा

>>>कृपया पुढच्या १० whatsapp गटात हा संदेश पाठवा>>>

-------------------------------

१. खालील फुलाच्या आकृतीमध्ये क्रमांक १ चा, हिरव्या रंगाचा पानासारखा भाग दिसतो त्याला काय म्हणतात?

अ)दलपुंज
ब) निदलपुंज✅
क) पर्णपत्र
ड) पर्णाधार  
                 
२. खालील फुलाच्या आकृतीमध्ये क्रमांक २ मध्ये दाखवलेल्या फुलाच्या पाकळीचे शास्त्रीय नाव काय आहे?
अ)दलपुंज✅
ब) निदलपुंज
क) पुमंग
ड) जायांग                      

३. खालील फुलाच्या आकृतीमध्ये क्रमांक ३ मध्ये दाखवलेल्या फुलाच्या भागाचे शास्त्रीय नाव काय आहे?

अ)दलपुंज
ब) निदलपुंज
क) पुमंग✅
ड) जायांग
                     
४) खालीलपैकी कोणता भाग स्त्री केसराचा नाही?
अ) कुक्षी
ब) कुक्षीवृंत
क) अंडाशय
ड) परागकोश✅                      

५. चित्रातील पान कोणत्या प्रकारात मोडते?

अ) दंतेरी✅
ब) खंडित
क) सलग
ड) संयुक्त                      

६) बीजांडे कशामध्ये असतात?
अ) परागकोश
ब) वृक्क
क) अंडाशय✅
ड) पुष्पाधार                      

७)खालीलपैकी कोणता भाग पानाचा नाही?
अ) पर्णाग्र
ब) पर्णिका✅
क)शीर
ड)पर्णधारा                      

८) आकृतीत दर्शविलेले मूळाचा प्रकार कोणता आहे?
अ) तंतुमय मूळ✅
ब) आगंतुक मूळ
क) रूपांतरित मूळ
ड) सोटमुळ                      

९) आकृतीत बाणाने दर्शविलेल्या भागास काय म्हणतात?
अ) प्राथमिक मूळ
ब) उपमुळ
क) मूलरोम
ड) मूलटोपी✅

१०) आकृतीत दाखविलेली पानांची मांडणी कोणत्या प्रकारातील आहे?

अ) एकांतरीत
ब) आवर्ती
क) संमुख✅
ड) वर्तुळाकार

----------------------

नमस्कार,

पूर्ण महाराष्ट्रातून घेतलेल्या #विज्ञान ऑनलाईन चाचणीमध्ये ११२ सदस्यांनी भाग घेतला. अजूनही अनेकजण प्रश्नपत्रिका सोडवत आहेत, परंतु निकालाकरता आपण १० वाजेपर्यंतचे प्रतिसादच ग्राह्य धरलेले आहेत.

निकाल पुढीलप्रमाणे :

१. Vishwas Gangurde - 8/6/2017  9:06:55 PM - मुंबई - १० गुण
२. Neelam Kumbhar - 8/6/2017  9:07:53 PM - मुंबई उपनगर - १० गुण
३. Sudam Kumbhar - 8/6/2017  9:08:15 PM - मुंबई उपनगर - १० गुण
---------------------

या तिघांशिवाय १० वाजेपर्यंत, १० गुण मिळवलेले सदस्य खालीलप्रमाणे :

Santosh Pawar - 8/6/2017  9:11:31 PM - सांगली
नितीन खंडाळे - 8/6/2017  9:15:38 PM - जळगाव
तुषार म्हात्रे - 8/6/2017  9:18:10 PM - रायगड
Suraj Shinde - 8/6/2017  9:21:56 PM - सोलापूर
अनंता - 8/6/2017  9:25:33 PM - 8/6/2017  9:25:58 PM - अहमदनगर
Vilas ambedare - 8/6/2017  9:25:58 PM - भंडारा
शिवराज नायकोड़े - 8/6/2017  9:33:36 PM - उस्मानाबाद
Smita puranik - 8/6/2017  9:52:51 PM - सांगली

उत्तरपत्रिका - https://goo.gl/f9fMfj

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान आणि मराठी पिझ्झा तर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा💐🎁

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#मराठी पिझ्झा

Comments

Post a Comment